दैनिक चालू वार्तापालघर जिल्हा प्रतिनिधी._ प्रा.मिलिंद खरात.
१९८७ साली तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना स्थापन केली. त्यापाठोपाठ आपण निकम नलावडे यांना पुढे करीत ठाणे (पालघरसह) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना स्थापन केलीत. मुंबई ठाणे पालघर मधील शिक्षकांच्या सेवा कायम केल्या, सेवा सुविधा मिळवून दिल्या. महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा महासंघ मजबूत केला. सेवा सुरक्षितता, सेवेचे लाभ, वेतनश्रेणी सुधारणा, मूल्यमापनाचे दर वाढवणे, सेवांतर्गत प्रशिक्षण, सेवानिवृत्ती वेतन वेळेवर सुरू होणे, नियमित वेतन वेळेवर मिळणे इत्यादी कोणतीही बाब असो तुम्ही त्यात पुढाकार घेतला नाही, सुधारणा झाली नाही असे घडले नाही. गेली ३५ वर्षे तुम्ही शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण संचालनालय, शिक्षण मंडळ, मंत्रालयातील शिक्षण विभाग, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल सर्वत्र आपण शिक्षकांसाठी धावत राहिलात, संघर्ष करत राहिलात, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण आजतागायत जिकिरीचे प्रयत्न करीत आहात याबद्दल आम्हां सर्व शिक्षक बंधू-भगिनींना आपला अभिमान वाटतो. आपल्या या कार्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन*.
आपण जे कार्य करत आहात त्यास खरोखरच तोड नाही. महासंघाच्या मार्फत आपण आजतागायत शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शेकडो आंदोलने, धरणे व निषेध व्यक्त करून तो अन्याय दूर केलेला आहे. म्हणूनच आपणास आम्हीं ‘ आंदोलनकर *हे नाव दिलेले आहे. आमच्या सारखे अनेक नवीन कार्यकर्ते तुम्ही निर्माण केलेत. परंतु आपणाकडून अजूनही खूप गोष्टीं शिक्षकांना अपेक्षित आहेत. शिक्षकांसाठी आपण एक*दीपस्तंभ*म्हणून महासंघाच्या मागे ठामपणे उभे राहून महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेमार्फत शिक्षकांना मार्गदर्शन करीत आलात,. समस्या सोडवत आलात, यापुढेही आपण हे कार्य करीत राहाल त्यासाठी आपणास अनेक उत्तम शुभेच्छा आज आपला प्रवास अतिशय खडतर व त्यागाचा होता हे आम्हास ज्ञात आहे. आपला पुढील प्रवास अतिशय आनंदी व सुखी व्हावा यासाठी तमाम* महाराष्ट्रातील शिक्षक आजच्या आपल्या ६७ व्या वाढदिवसाच्या आपणास शुभेच्छा देऊन परमेश्वराकडे मागणी करीत आहेत की आपणास परमेश्वराने दीर्घ निरोगी आयुष्य द्यावे
