
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
आज पर्यंत आपण माणसाचा,गाडीचा, गाईचा, यांचा वाढदिवस केलेला ऐकले होते , परंतु इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावांमध्ये चक्क कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावांमध्ये बोराटे कुटूंबीय यांनी आपल्या घरातील पाळीव असणारी बसंती या नावाच्या कुत्रीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.बंसती हि एक पाळीव प्राणी नसुन ती एक घरातील सदस्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे.बंसतीच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक सजावट, तीच्या नावाचा केक,तीला ओवाळून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
या वाढदिवसामुळे संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला असून बोराटे कुटुंबीयांनी पाळीव प्राण्यांना वरती दाखवलेल्या आपुलकी व प्रेमाबद्दल त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी लहान योगिता शिंदे,आर्या शिंदे, माऊली शिंदे याबरोबरच घरातील सर्व सदस्य उपस्थित होते.