
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती-नागपूर इंटरसिटी रेल्वे आणि अमरावती-जबलपूर रेल्वे ह्या दोन्ही रेल्वे गाड्या गत दोन वर्षापासून बंद आहेत.ह्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रेल्वेगाड्या तत्काळ सुरू करण्यात याव्या या मागणीकरिता समाजवादी पक्षाच्या वतीने अमरावती रेल्वे प्रबंधकांना निवेदन देण्यात आले.
अमरावती नागपूर इंटरसिटी गाडी क्रमांक १२१२० आणि अमरावती जबलपूर गाडी १२१६० या गाड्या कोरोना काळापासून बंद आहे.त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी त्रास होत असल्याचे समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.सोबतच
इतर ठिकाणी जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा वापर करावा लागत आहे.इंधन दरवाढीमुळे प्रवासभाड्यात दर वाढल्याने खाजगी गाड्यांमधून प्रवास करणे त्यामुळे खर्च वाढून वेळ सुद्धा वाया जातो.बंद असलेल्या या दोन्ही गाड्या सुरू केल्या तर ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी,व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना सोईचे होईल.अमरावती शहरातील रायली प्लॉट व जयस्तंभ चौक येथील रेल्वे तिकीट काऊंटर तत्काळ सुरू करण्यात यावे,अशी मागणी समाजवादी पक्षाने निवेदनातून केली आहे.यावेळी जिल्हा पातळीवरील समाजवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.