
दैनिक चालू वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
मा.खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार
म्हसळा –
म्हसळा तालुक्यातील, ठाकरोळी विभागातील कोकबल या गावातील मांडवकर परीवारातील कुमारी रेवती अनंत मांडवकर हिने गोरेगाव येथे दादासाहेब फाळके फिल्मसिटी मध्ये कलर्स हिंदी टि. व्ही.चॅनलवर हुनरबाज डान्स कॉम्पीटीशन मध्ये प्रथमच फस्ट रॅंक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे या कलेबाबत रेवती हिचे सर्वच क्षेत्रातातून कौतुक होत आहे. रेवती मांडवकर हिचे शिक्षण विरार विवा कॉलेज मध्ये एफ. वाय .बी कॉम .( बीबीआय)
एका कोकबल या दुर्गम भागातील रेवती हिने जास्तीत जास्त परिश्रम घेऊन आपले स्व:ताचे नाव व परिवाराचे नाव कलेबाबत नक्कीच प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे.
या कलेबाबत पुढील दिशा शो साठी हैदराबाद,बॅगलोरसह विदेशात अमेरिका, लंडन, इजिप्त या ठिकाणी माणस आहे यासोबतच ईतर टिम सुध्दा आहे. अशा कलेच्या कार्याबद्दल डान्सरपट्टू रेवती अनंत मांडवकर आणि वडिल अनंत मांडवकर यांचा रायगड जिल्ह्याचे खासदार मा. श्री.सुनिलजी तटकरे यांच्या शुभहस्ते भेटवस्तू शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी तमासगीर श्री नथुरामजी घडशी यांचा हि तटकरे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष महेश शिर्के,समिर बनकर, अली कौचाली ,सुनिल शेडगे,सतीश शिगवण , पांडुरंग मांडवकर, दिलीप मांडवकर, रेष्मा कानसे , स्नेहा सोलकर, मधुकर गायकर,लहु म्हात्रे , संतोष शिंदे, सहदेव भुवड, विश्राम काप, गणेश शिगवण, महेश शिंदे, संदिप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोकबळ आवर्जून उपस्थित होते. यावेळी कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई अध्यक्ष मा श्री रमेश शिंदे, उपाध्यक्ष संतोष घडशी , नथुराम भुवड , सेक्रेटरी सदानंद आग्रे , संघाचे उपाध्यक्ष बबनराव उंडरे सल्लागार राजु जाधव,अनिल बांद्रे यांनी रेवती हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.