दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलास देत पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, यानंतर पेट्रोल 9.5 प्रतिलिटर आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे, दरम्यान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार माणले आहेत.
फडणवीस ट्वीट करत म्हणाले की, पेट्रोल 9.5 रूपये प्रतिलिटर, डिझेल 7 रुपये प्रतिलिटर ने स्वस्त होणार! पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अनेकानेक आभार!
सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना फडणवीस यांनी लिहीले की, यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 6100 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचे कौतुक करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदापंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे असे सांगत, गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात, असे म्हटले आहे, या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.
