दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्यीत हायटेक रोपवाटिका व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे आणि भारती पोमणे यांनी उभारलेल्या शेडनेट हाऊस आणि रोपवाटिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. हा स्तुत्य उपक्रम असून रोपवाटिकेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. अशाप्रकारचे व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं.
