दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार शहराजवळील मन्याड नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना 22 मे रोजी रविवारी दुपारी घडली यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कंधार शहरातील सौरभ सतीश लोखंडे वय वर्षे 16 रा. लॉ कॉलेजजवळ कंधार व त्याचा मित्र ओम राजू काजळेकर वय वर्षे 15 रा. गवंडीपार कंधार असून हे दोघे हि 22 मे रोजी दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या शेताच्या शिवारात दक्षीनेस तीन किलोमीटर मन्याड नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने आणि पात्रात गाळ साचल्याने पाण्यात बुडाले. अशी माहिती त्यांच्या सोबत असणारा मुलगा बालाजी तुकाराम डांगे रा. रंगारगल्ली कंधार यांनी त्यांच्या घरी जाऊन दिली. तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या घरचे गेले तेव्हा तिथे राजू काजळेकर हे देखील आले होते. त्यानंतर आम्ही व परमेश्वर बालाजी चौधरी, कृष्णा बालाजी चौधरी रा. गवंडीपार कंधार आणि लक्ष्मण गुंडप्पा जोतकर रा मुक्ताईनगर कंधार यांच्या मदतीने दोन्ही मुलांचा मन्याड नदी पात्रात शोध घेऊन दोघांच्याही मयत बॉडी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली.
माझा मुलगा सौरभ लोखंडे व त्याचा मित्र ओम काजळेकर पोहण्यासाठी मन्याड नदीपात्रात गेले. ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने पात्रात गाळ साचल्यामुळे पाण्यात बुडून मरण पावले. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नि. आर यु गणाचार्य हे करीत आहे रात्री उशिरापर्यंत कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाचा ची प्रक्रिया चालू होती.
