दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीं पुण्यात सभा पार पडली.
यावेळी नदीपात्राच्या सभेविषयी स्पष्टीकरण देताना राज यांनी नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. एकूणच सध्याचं हवामान पाहता कोणत्याही वेळी पाऊस पडेल, असे चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर पलटवार केलाय. एवढे दिवस सभा घेताना काय पाऊस वाटत होतं का ? शिवाजी पार्कात सभा घेतली तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते का ? अफजल खान, औरंगजेब, भोंगा ह्यापेक्षा पेट्रोल-डिझेल गॅसची वाढलेली किमंत, बेरोजगार झालेली तरुण पोरं, त्याच्यावरती बोलूयात. 300 ते 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये, असा हल्लाबोल आव्हाड यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
माध्यमांशी बोलताना आव्हाड पुढे म्हणाले, राज ठाकरे यांच्या भाषणालाच काही अर्थ उरलेला नाही, त्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचं म्हणून बोलतात, लोकं ऐकायला जातात, कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो. अशा शब्दांत आव्हाड यांनी राज यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, अयोध्या दौऱ्याविषयी बोलताना राज यांच्यावर टीका करत आव्हाड म्हणाले, कुणी सापळा रचला ? कमी काय केलं, हे त्यांचं त्यांना माहीत.आम्हाला त्या वादात पडायचं नाही. तुम्ही अयोध्या ला जा, नका जाऊ, तुम्ही कुठे जाता. काय करता याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तुमच्या भोंग्यांचा राजकारण झालं.मला अभिमान आहे, महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखले की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करतायत. 3 तारखेला काहीही झालं नाही. पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या तमाम काकड आरत्या बंद झाल्या. असंही आव्हाड म्हणाले.
