
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश नामदेव माने
जालना, दि. 23 – चोरट्यांनी 41 लाख 53 हजार रुपयांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना जालना शहरात घडली. सुरेश मगरे आणि त्यांचे भाऊ कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी औरंगाबादेत गेले होते. हे हेरून चोरट्यांनी घर फोडले. जालना शहरातील रुख्मिण गार्डन परिसरात या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जालना शहरातील रुख्मिण गार्डन परिसरातील सुरेश मगरे यांच्या घरामध्ये प्रवेश करून 41 लाख 53 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह इतर मुद्देमाल लंपास केला. ही घटना सीसीटीव्ही कॕमेऱ्यात मध्ये कैद झाली आहे. घर मालक घरी नसल्याची माहिती चोरट्यांना आधीपासूनच असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आली असून चोरीस गेलेल्या माला मध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 2 लाख 31 हजार रुपये असे एकूण 41 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपाची सूत्रे फिरवली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात सुरेश पंढरीनाथ मगरे यांच्या तक्रारीवरून कलम 454,457,380 भांदवी नुसार आज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (
चोरीस गेलेला ऐवज असा- दोन सोण्याचे तोडे वजन अंदाजे 45 ग्रॅम कि. अंदाजे 2,50,000/-रु.
एक सोण्याचा पोहे हार वजन अंदाजे 40 ग्रॅम कि. अंदाजे 2,00,000/-रु.
एक सोण्याची एकदानी, ज्यामधिल 15 ग्रॅमचा पदक व त्याचे 15 ग्रॅमचे कानातले ज्याचे वजन अंदाजे 45 ग्रॅम कि. अंदाजे 2,25,0000/-रु.
दोन सोण्याचे लहान मंगळसूत्र वजन अंदाजे 20 ग्रॅम कि अंदाजे 1,00,000/-रु.
दोन सोण्याच्या अंगठ्या वजन अंदाजे 10 ग्रॅम कि. अंदाजे 50,000/-रु.
04 सोण्याचे डोरले वजन अंदाजे 20 ग्रॅम कि अंदाजे 1,00,000/-रु.
05 सोण्याचे मनी वजन अंदाजे 02 ग्रॅम कि. अंदाजे 50,000/-रु.08) दोन सोण्याचे लॉकेट वजन अंदाजे 20 ग्रॅम कि. 1,00,000/-रु.
आठ कानातले जोड वजन अंदाजे 50 ग्रॅम कि. अंदाजे 2,50,000/-रु.
एक मोठे सोण्याचे मंगळसूत्र वजन अंदाजे 4 तोळे कि. अंदाजे 2,00,000/-रु.
04 सोण्याचे बांगडया वजन अंदाजे 06 तोळे कि. अंदाजे 3,00,000/-रु.
एक सोण्याचे ब्रेसलेट वजन अंदाजे 02 तोळे कि. अंदाजे 1,00,000/-रु.
एक सोण्याचे लॉकेट वजन अंदाजे 01 तोळा कि अंदाजे 50,000/-रु.
05 सोण्याच्या अंगठ्या वजन अंदाजे 15 ग्रॅम कि. अंदाजे 75,000/-रु.
दोन सोण्याचे नेकलेस वजन अंदाजे 100 ग्रॅम कि. अंदाजे 5,00,000/-रु.
तीन सोण्याचे मोठे नेकलेस प्रत्येकी 06 तोळे कि. अंदाजे 9,00,000/-रु.
नगदी 2,25,000/-रु. रोख रक्कम
एक सोण्याचे मोठे मंगळसूत्र वजन अंदाजे 35 ग्रॅम कि. अंदाजे 1,75,000/-रु.
दोन लहान सोण्याचे मंगळसूत्र वजन अंदाजे 10 ग्रॅम व त्याला जोडलेले डायमंड पेंन्डन कि. अंदाजे 75,000/-रु.
03 सोण्याचे पेंडण वजन अंदाजे 21 ग्रॅम कि. अंदाजे 1,00,000/-रु.
कानातील सोण्याचे वजन अंदाजे 04 ग्रॅम कि. अंदाजे 22,000/-रु.
02 सोण्याचे सेठ वजन अंदाजे 20 ग्रॅम कि. अंदाजे 1,00,000/-रु.आणि 23) नगदी 6,000/-रु. एकूण 41,53,000/-रु. घरफोडी करुन चोरी केला प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कार्यावाहीकामी पोउपनि वाघ यांच्याकडे दिला.