
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नागपूर: केंद्र सरकारने मंकीपॉक्स संदर्भात अलर्ट दिला आहे, यावर बोलतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारने हाय अलर्टवर जे काही निर्देश दिले असतील. त्या निर्देशाचे तंतोतंत पालन आरोग्य विभागामार्फत शेवटच्या घटकापर्यंत पोहचवू, त्या सूचनांची अंमलबजावणी करू, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच या संदर्भात नागपूर महानगर पालिकेने खबरदारी म्हणून वेगळा वार्ड तयार केला आहे. त्याचबरोबर मुंबई विमानतळावर तपासणी सुरू केल्याचेही टोपे यांनी सांगितले.
मंकीपॉक्सवरील केंद्राच्या हाय अलर्ट निर्देशाचे तंतोतंत पालन करू असें आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेंच
आरोग्य विभागाला सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा वय वाढवून सेवा घेण्याची वेळ आली. पण आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे नवीन तरुण मुलाना जबाबदारी घेण्यासाठी संधी दिली पाहिजे, यापुढे वय वाढवणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणालेत. 18 ते 59 वयोवृद्धासाठी बुस्टर लस फ्री दिली नाही. ही लस गरजेनुसार घ्यावी, प्रत्येकांनी घ्यावे असे नाही. तसेच केंद्र सरकाराच्या पुढील सुचनेची वाट पाहत आहोत.
नागपुरातील चार थलेसेमियाच्या रुग्णांना ब्लड बँकेतील चार बालकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे माहिती पुढे येत आहे. या संदर्भात तसे काही झाले असल्यास, संपूर्ण चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.