
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:
देगलूर तालुक्यातील मौजे येरगी येथे सरपंच संतोष पाटील inयांच्या पुढाकाराने शेतकरी वर्गाचे गत वर्षीचे पीक कर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया चे अधिकारी व कर्मचारी यांना गावातच बोलावून घेऊन पीक कर्जाचे नूतनीकरण केले.संतोष पाटील यांच्या या कार्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी अक्षय मारडवार,कर्मचारी संतोष दाउबे यांनी पीक कर्ज खात्याचे नुतनीकरण करून चालू वर्षासाठी वाढीव कर्ज मंजूर केला. त्यामुळे शेतकरी वर्गाचा पीक कर्जासाठी होणारा आर्थिक व मानसिक ताण कमी करण्यास मदत झाली.
याकामी सरपंच संतोष पाटील यांनी बॅक प्रशासन व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रसंगी राजु सोमावार, प्रभाकर काळीगवार, शिवा कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.