
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठीचा अखेरीस संजय पवार या शिवसेनेचा मावळ्यला संधी! उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे – संजय राऊत
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी अखेरीस कोल्हापूरमधील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे, अशी घोषणाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संभाजीराजे यांचा आदर आहे, पण त्यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली म्हणून आता आमच्याकडून फाईल बंद झाली, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं. संभाजीराजे यांना शिवसेना उमेदवारी देणार की नाही, याबद्दल मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेरीस संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. ‘सहावा उमेदवारच कुठे आहे, संजय पवार यांचं नाव फायनल झाले आहे.
संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार आहे.संभाजीराजे यांचा आदर आहे, पण त्यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली म्हणून आता आमच्याकडून फाईल बंद झाली, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं. संभाजीराजे यांना शिवसेना उमेदवारी देणार की नाही, याबद्दल मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेरीस संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. ‘सहावा उमेदवारच कुठे आहे, संजय पवार यांचं नाव फायनल झाले आहे.
संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार आहे.