
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिध्दनाथ : – नांदेड तालुक्यातील सिध्दनाथ येथे आमदार श्री. मोहनराव हंबर्डे साहेब यांच्या आमदार निधीतून २३ लाख रुपये सिध्दनाथ येथे पाणंद रस्त्याचा कामाचा शुभारंभ हंबर्डे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार म्हणाले हे काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत व्हायला हवे , तसेच गावातील माय-माऊलींना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा यासोबतच रोजगार हमी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. हे देखील नमूद केले. याप्रसंगी राजेश हंबर्डे यांच्यासह सिध्दनाथ येथील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार निधी उपलब्ध करून काम सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांनी हंबर्डे साहेबांचे आभार मानले आहेत.