
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:दि. १९/०५/२०२२ रोजी मरखेल पोलीस स्टेशन य्या हद्दीत असेलले गाव मरतोळी या ठिकाणी महीला मंडळानी किणी शिवारातील अवैध हातभट्टी व भिंगरी ही दारू विकणाऱ्या दुकाणावर पोलीस नाईक ५२६ राजू चांदू वाघमारे व २५०५ पोलीस हवालदार प्रभाकर कदम यांनी कारवाई केली होती.
या कारवाईत देशी दारू व हातभट्टी विकताना एक स्त्री व एक मुलगा ताब्यात घेतला, पातेले भरून पैसे जप्त केले पण दुसऱ्या दिवशी या ताब्यात घेतलेल्या दोघांनाही पोलीसांनी सोडून दिले म्हणून महाराष्ट्र दारूबंदी समितीचे सचिव यांनी मरखेल पोलीस स्टेशनला विचारना करण्यास गेलो असता कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यातआले असे समजले, तेच सोडून दिलेले आरोपी दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू विकत होते महिला मंडळांनी एवढ्या जीवाच्या आकांताने दारू दुकान बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पोलीस प्रशासनाने त्यांना पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून दिले त्यामुळे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना पोलीसांचा कसलाही धाक नाही हे स्पष्ट दिसत आहे पोलिस प्रशासनच अवैद्य दारू विक्री करणार्यांना प्रोत्साहन देत आहे हे यामधून जाणवते, आम्ही पोलिसांना हप्ता देतो त्यामुळे पोलीस आमचे काहीही करू शकत नाही दारू विक्रेते बोलत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व दारू विक्रेते यांचे कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे ई-मेल महाराष्ट्र दारूबंदी कृती समितीचे सचिव व महाराष्ट्र दारूबंदीचे देगलूर तालुका अध्यक्ष यांनी इंस्पेक्टर जनरल नांदेड, महाराष्ट्र पोलीस कंट्रोल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले या संबंधित प्रकाराचे चौकशी व्हावी अन्यथा या प्रकारात विरोधात आणि उपोषणाचे हत्यार उपसू असे ते म्हणाले