
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
एका ग्रामीण भागातील तरुण अनिकेत सुरणर हा बनला युवा उद्योजक
लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील रामतिर्थ येथील मुलगा बनला युवा उद्योजक अनिकेत सुरनर हा तरुण सुशिक्षित बेरोजगार युवक कॅम्पुटर व सोशल नेटवर्किंगचे ज्ञान पण नौकरी नाही हताश न होता यानी रुबाब ब्रांडेड मेन्स वेअर या नावानी २०२१ ला लघुउद्योग करण्यास सुरुवात केली.त्यानी रुबाब ब्रांडेड मेन्स वेअर या नावानी आपली पहिली शाखा लोहा येथे सुरू करण्यात आली.
अल्पावधीतच रुबाब ब्रांडेड मेन्स वेअर कपडे खरेदी करण्यासाठी तरुणांनाची गर्दी व मार्केट मध्ये त्यानी आपली अल्पावधित नवीन केरज निर्माण केली असेच नवनीन डिज़ाईन तो घेउन येत असे त्याच्या नवनविन पैटर्न नवनविन डिझाईननी तालुक्यातील तरुणांच्या मनाला भुरळ. पाडत असे व अनेक नामांकित कंपन्याच्या व त्यानी आपल्या स्वतःच्या ब्रँडची निर्मिती करून नवीन नवीन डिझाईन व नवीन नवीन पॅटर्न शर्ट पॅन्ट अर्मानी टी-शर्ट नाईट पॅन्ट विक्रीस उपलब्ध करण्यात आली पाहता-पाहता रुबाब ब्रँडेड मेंन्स वेअरने यशाची उत्तुंग भरारी घेतली. लोहा येथे पहिल्या शाखेचे उद्घाटक करण्यात आले. त्त्या बँड ला चागलाया प्रतिसाद मिळत असल्यामुळे पाहताच 10 ते 12 शाखेमध्ये रुपांतर झाले. रुबाब ब्रँडेड मेन्स वेअरचा दहा ते बारा शाखेचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यासह परराज्यातही रुबाब ब्रांडेड मेंन्स वेअरचा डंका वाजला.यामध्ये लोहा, पालम, परभणी, पूर्णा, मांजरसुंबा, अहमदपूर, यासह बोकारो स्टील सिटी झारखंड येथे शाखा स्थापन करण्यात आली. पाहता पाहता एका शाखेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.