
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – माधव गोटमवाड
नांदेड : गेली पंधरा दिवसापासून शिक्षकांच्या वेतनादायीसाठी सीएम प्रणाली अंमलबजावणीचा खटाटोप बुधवारी पूर्ण होऊन जिल्ह्यातील शिक्षकांचे एप्रिल महिण्याचे वेतन एका क्लिकमध्ये संबधीतांच्या बँक खाती जमा करून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे ,मुख्य वित्त लेखाधिकारी शिवप्रसाद चन्ना यांनी शिक्षकांना सरप्राईज दिले.
शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनासह विविध शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लावून धरली होती. त्यानुसार शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षण विभागास दिले दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची बँक खाते त्यांचे शालार्थ क्रमांक अद्यावत करण्याची कारवाई केली . दरम्यान एप्रिल महिन्याचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षण विभागास दिला होता.सदरील प्रणाली राबवताना अत्यंत काटेकोरपणे संपूर्ण माहिती तपासून सर्व शिक्षकांचे वैयक्तिक बँक खाते अद्यावतीकरण व शालार्थ खाते यांचा ताळमेळ घालून ही प्रक्रिया पार पाडणे अत्यंतक्लिष्ट अशी काम पुर्ण करण्यात आली आहेत. बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सीएमपी प्रणाली प्रारंभ करून शिक्षकांचे वेतन बँक खात्यामध्ये जमा केले आहे. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे उपस्थितीत होते.संघटनेच्या वतिने पाठपुरावा करण्यासाठी राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे ,राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे ,विभागीय अध्यक्ष शिवशंकर सोमवंशी ,जिल्हा नेते ग.नु.जाधव ,जिल्हाध्यक्ष अशोक मोरे,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,कार्यध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे ,कोषाध्यक्ष बळीराम फाजगे ,जिल्हा मुख्य संघटक जे.डी.कदम संघटनेच्या वतिने आदींनी प्रयत्न केला.