
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- ग्रामपंचायत कार्यालय मौजे धसवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अभिलेख मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने लाभार्थ्यांचे शपथपत्र, सहमतीपत्र,आणि आधार कन्सेट फॉर्म इत्यादी अभिलेख जमा केले होते
परंतु माहिती अधिकारात सदर अभिलेख ग्रामपंचायत कार्यालय मौजे धसवाडी व पंचायत समिती कार्यालय अहमदपूर येथे नसल्याचे आढळून आले.
सविस्तर वृत्त असे की माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष भसमपुरे यांनी प्रधानमंत्री आवास योजना संबंधित सर्व माहिती .माहिती अधिकार अधिनियम २००५ खाली मागितली होती .
अर्धवट माहिती मिळाली असल्यामुळे त्यांनी प्रथम अपील दाखल केल्यानंतर सुनावणीत असे सिद्ध झाले की सदर योजनेचे अभिलेख हे दोन्ही कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत.दोन्ही कार्यालयाचे संबंधित अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत,परंतु अपिलीय अधिकारी यांनी निर्णयात असे लेखी कळवले आहे की सदर योजने संबंधित सर्व अभिलेख दोन्ही कार्यालयाकडे नाहीत.
माहिती आयुक्त यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करून
संबंधित प्रकरणाची तक्रार जिल्हा अधिकारी लातूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि प लातूर यांच्याकडे करणार असल्याचे श्री संतोष भसमपुरे यांनी म्हटले आहे.