
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड :- तलाठी भरती २०१९ नुसार बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र अभिलेख अपूर्ण असते वेळी जाणून बुजून तलाठी पदासाठी निवड केले १) श्रीमती प्रिया विठ्ठलराव भालेराव यांच्याजवळ जाहिरातीतील निकषांनुसार ३०%महीला आरक्षण प्रमाणपत्र नाही आणि नाॅनक्रिमीलीयर प्रमाणपत्र नसते वेळी जिल्हाधिकारी यांनी अपात्र उमेदवाराला पात्र ठरविले. २) श्री. प्रकाश उत्तम हसनाबादे मिल्टृरीच्या सेवापुस्तीकेवर लिंगायत जातीचे नोंद आहे. त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराने बोगस वाणी जातीचे प्रमाणपत्र मिळविले त्या आधारावर ई. मा माजी सैनिक यांची १५% समांतर आरक्षणावर तलाठी पदासाठी अंतिम निवड केली आहे. सदरील अपात्र उमेदवारास निव्वळ तात्पुरती नियुक्ती आदेश दिले त्याची नियुक्ती रद्द करून कायदेशीर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यासह एक दिवसाच्या उपोषणाला बसत आहोत.उपविभागीय अधिकारी यांना काहीतरी थातूर मातूर पत्रव्यवहार केला त्यावर काहीही निष्पन्न झाले नाही. अध्यक्ष जिल्हा निवड समिती या नात्याने आमच्या पुराव्यांची ५० दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून शहानिशा करीत आहात. अद्याप ठोस निर्णय न घेता “तु कर मारल्या सारखे, ” मी करतो रडल्यासारखे”या म्हणी प्रमाणे काम चालू आहे. आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. मकरंद दिवाकर हे च देगलूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते, त्यांनीच माजी सैनिकांचे सेवा पुस्तीका व प्रिया भालेराव यांचे नाॅनक्रिमीलीयर प्रमाणपत्र नसल्याचे माहित असताना देखील तलाठी पदाच्या नियुक्तीसाठी योग्य असे टिप्पणी लिहून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास उपविभागीय अधिकारी देगलूर यांना सहकार्य केले आहे.कृपया तात्काळ संबंधित अपात्र उमेदवारांचे नियुक्ती रद्द करून कारवाई करावी, त्यासाठी खालील कार्यकर्त्यांसह एक दिवसीचे उपोषण करीत आहोत.तद्नंतर मंत्रालय मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल याची दखल घेऊन अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात असे श्री. एस. एस. खैरवाड ( अध्यक्ष मा. अ. का. स. म.), श्री. माधवराव वडजे (जि.अ.मा.का.म.) श्री. पांडुरंग कंधारे (चेअरमन, ख. वि. सं. पेठवडज) व्यंकट जाधव( पत्रकार सामाजिक कार्यकर्ता) सय्यद मंजूरअल्ली सय्यद खुर्शीद अल्ली (पत्रकार दै. चौफेर अर्थापुर), मारोती कांबळे(सर्कल प्रमुख करडखेड), मालोजी कांबळे(प्रतिनिधी मुखेड) राजू येळगे (प्रतिनिधी मुखेड) ,संभाजी पवळे(प्रतिनिधी नायगाव) , लक्ष्मण बि. कौसंले (प्रतिनीधी कंधार) यांनी कळविले आहे.