
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- गुणाजी मोरे
आमदार महेश लांडगे घेणार देशांतील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत; दीड कोटींची बक्षिसेही —————————————-
पिंपरी – चिंचवड : बैलगाडा शौकीनांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरणार आहे. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, एकशे सोळा दुचाकी आणि रोख रकमांची बक्षीस विजेत्या मालकांना दिली जाणारेत. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची ही रक्कम जातीये. भाजपचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी या शर्यतीचं आयोजन केलंय. 28 ते 31 मे दरम्यान होणारी ही देशातील सर्वात मोठी शर्यत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळेच देशासह राज्यातील दिग्गज नेत्यांची इथं हजेरी लागणार आहे.
अठ्ठावीस लाखांचा एक जेसीबी, एक बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी…. बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना ही वाहन बक्षीस रूपात मिळणार आहेत. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची रक्कम जात असल्याने ही देशातील सर्वात मोठी शर्यत आहे. असा दावा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधवांनी केलाय. मधल्या काळात बैलगाडा शर्यतींना ब्रेक
लागला, त्यामुळं बैलगाडा शौकिनांचा हिरमोड झाला होता. पण न्यायालयीन लढा जिंकला अन् घाटात पुन्हा धुरळा उडू लागला. तेव्हाच देशातील सर्वात मोठ्या शर्यतीची अनुभती द्यायची हे ठरवलं होत. याच संकल्पनेतून भाजपचे आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी या जंगी शर्यतीचे आयोजन केलं आहे.