
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेकडून येत्या ३१ मे रोजी निवडणूकांसाठी महिलांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत प्रशासनाकडून काढली जाणार आहे.गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे,निवडणूक प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी या सोडतीसाठी आज पाहणी केली. या सोडतीपूर्वी एक दिवस आधी रंगीत तालीमही आयोजित केली आहे.
महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणा शिवाय, महापालिकेच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता केवळ महिलांसाठीचे प्रभाग तसेच एससी आणि एसटीसाठी आरक्षित ठरलेल्या प्रभागांमधील महिलांसाठीच्या राखीव जागांचे आरक्षण काढले जाणार आहे. दरम्यान, पालिकेच्या निवडणूकांसाठी ५८ प्रभाग निश्चित असून ५७ प्रभाग ३ सदस्यांचे तर एक प्रभाग २ सदस्यांचा असणार आहे. एकूण सदस्य संख्या १७३ असून महिलांसाठी ८७ जागा राखीव असणार आहेत.
या जागांसाठी ही आरक्षणे काढली जाणार आहेत. या आरक्षणाच्या कामासाठी गणेश कला क्रिडा मंच निवडले आहे