
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : काल भाजपा तर्फे ओबीसी आरक्षणा बदल मोठे आंदोलन करण्यात आले. मंत्रालयावर सरकार विरूध्द संताप मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील सुप्रियाताई सुळेंना उद्देशून म्हणाले की, ” तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही आधी एक शिष्टमंडळ पाठवायचे असते अन भेटायचे असते. आता तुमची घरी जायची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा पण ओबीसींना आरक्षण मिळवून द्या. उगाच फुकटची सत्ता उपभोगू नका.” ह्या त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात टीकेची झोड उठली. सुप्रियाताईंचे पती म्हणाले कि भाजपा मध्ये स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार नाहीत. राष्ट्रवादी महिला मोर्चाने चंद्रकांत पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करून माफीची मागणी केली आहे. पुण्यात सूस रोड, बालेवाडी भागात पाटील यांच्या विरोधात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. एकंदरीत पुण्याच्या काही भागात वातावरण तंग आहे