
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरातील कै.विश्वनाथराव नळगे विद्यालयात पतंजली परिवार आयोजित ११ दिवसीय भव्य नि;शुल्क योग शिबिर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.सदरिल शिबिराची दिपप्रज्वलन माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी नगराध्यक्षा आशाताई रोहिदास चव्हाण,दिपक भातलवंडे, वैशालीताई भातलवंडे, राज्य प्रभारी अनिल आम्रतवार, लक्ष्मीकांत सावकार बिडवई, डॉ.सविता घंटे आदींच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
पतंजली योग परिवार लोहा यांच्या वतीने ११ दिवशीय भव्य निःशुल्क योग शिबिर दिनांक २६ मे २०२२ ते ०५ जुन २०२२ दरम्यान सकाळी०५.०० ते ०७.०० या वेळेत जिल्ह्यातील अनेक मान्यवर मार्गदर्शन करत असून त्यात उच्च रक्तदाब (ब्लडप्रेशर), मधुमेह,(शुगर),वातरोग,थायरॉईड,मोटापा,मान -पाट-कंबरदुखी,आदी रोगांवर सखोल मार्गदर्शन होत आहे.
पतंजली योग परिवार लोहाच्या वतीने मोहन पवार, सुर्यकांत बच्चेवार,चक्रवार,मोरे,विश्वांभर वाडे वाले,भालके गुरूजी यांसह अनेकांची उपस्थिती दिसून आली.