
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड: तालुक्यातील भवन येथे नापिकी कर्जबाजारी व पणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. भानुदास तुकाराम कळम (५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भानुदास कळम यांचेकडे दोन एकर शेती असून विविध बँकांसह खासगी सावकारांचे त्यांच्याकडे कर्ज होते. यंदा शेतात चांगले पीक न आल्याने कर्ज फिटणे अवघड होते. यामुळे ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सिल्लोड येथील उपजिल्हा त्यांच्या मृतदेहाचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात भवन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भानुदास कळम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.