
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि. २६:- नवीन शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, शाळा प्रशासन व शालेय विद्यार्थी यांची वाहतूक करणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना वैध योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायदा १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.