
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : कोरोनाव्हायरस पुन्हा मुंबईला आपल्या विळख्यात घेतो आहे शहरात पुन्हा हादरवणारा आकडा समोर आला आहे.
तीन महिन्यांनंतर दैनंदिन कोरोना रुग्णांचा पुन्हा हादरवणारा आकडा समोर आला आहे मुंबईत आज एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज गुरुवारी शहरात 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 11 फेब्रुवारीला 350 रुग्णांची नोंद झाली होती.