
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
दि.२७ महाराष्ट्राची धरती ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते जितकी खुर्ची उंच तितकी जबाबदारी अधिक असते. मी दगडुशेठ हलवाई दत्त मंदिराला शुभेच्छा देतो. अनेकवेळा मी महाराष्ट्रात आलो आहे.संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ यांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची धरती पवित्र झाली आह, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. दत्तमंत्र पठण करत त्यांनी आज पुण्यात भाषण करत असताना
यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी भाष्य केले. ते म्हणाले, मी अनेक वेळा प्रतिभाताई पाटील यांच्याशी बोललो आहे. महाराष्ट्रात मी बऱ्याचवेळा आलो आहे. या राज्याची धरती ही संतांची धरती म्हणून ओळखली जाते. त्यांच्या विचारांनी राज्याची माती पवित्र झाली आहे. मध्यंतरी मला रायगडला जायचं भाग्य लाभलं. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर अनेक शूर मराठा सरदार असतील येथे त्यांचा प्रभाव असल्याने एकजूट राहिली आहे. आजचा पुरस्कर मी राष्ट्रपती कार्यालयाच्या संग्रहालयात ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पहिली मुलींची शाळाही या राज्यात सुरु झाली. आनंदी गोपाळ या पहिल्या महिला डॉक्टरही महाराष्ट्राच्या होत्या. प्रतिभाताई पाटील यांनीही भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होऊन महाराष्ट्राची शोभा वाढवली. दगडुशेठ परिवार आणि ट्रस्टचे कौतुक करत ते म्हणाले, त्यांनी या शहराची स्फूर्ती जपून ठेवली आल त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदर करणार आहे. विदेशातील अनेक सरकारांनी भारतीय लोकांचा सन्मान ठेवला आहे. एकेठिकाणी विदेशात जाण्याचा प्रसंग आला तर त्या ठिकाणी रस्त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ठेवले आहे. त्याचे लोकार्पणही करण्याची संधी मला मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोतांना भाजपचा निरोप, यंदा विश्रांती घ्या