
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
एल अँड टि कंपनीने तोंडी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने…..
गंगापूर – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्ग करताना शेतकऱ्यांना सर्विस रोड उपलब्ध करून न दिल्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली अनंतपुर शिवार लासुर स्टेशन जवळ समृद्धी महामार्ग महामार्गावर धामोरी खुर्द चे उपसरपंच रवींद्र चव्हाण तसेच मावळा प्रतिष्ठानचे अद्यक्ष डॉ.रणजीत गायकवाड यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. आपण कायदेशीर मार्गाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळला निवेदन देऊन, जोपर्यंत आपला सर्व्हिस रोडचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत समृद्धी महामार्गाच्या कडेच्या दोन्ही साईटचे कंपाउंड चे काम करू नये अशी विनंती करूनही संबंधित ठेकेदार आपल्या शेतकरी बांधवांना पोलिसांचा धाक दाखवून दांडगाई करण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे धामोरी खुर्द चे उपसरपंच रवींद्र चव्हाण तसेच डॉक्टर रंजीत गायकवाड यांनी सांगितले सर्व शेतकरी कायदेशीर मार्गाने शांततेत आपला लढा देत असताना एल अँड टी कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी हे पोलिसांचा धाक दाखवून शेतकऱ्यावर दांडगाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा न सोडल्यास शेतकरी आता यापुढे आक्रमक होणार असून त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच एल अँड टी कंपनीला भोगावे लागतील शेतात जाण्याचा रस्ता उपलब्ध नसेल तर शेतकरी त्याच्या शेतीत पेरणी व मशागत कशी करेल असा प्रश्न या सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून आज लासुर स्टेशन जवळील अनंतपुर शिवारात समृद्धी महामार्गावर शेकडो शेतकर्यांनी एकत्र जमून एल अँड टी कंपनी च्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात घोषणाबाजी देऊन आंदोलन केली यावेळी अमोल पाटील जाधव, बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे, किशोर कोठारी,कैलास जाजू, अजय साखळे,अजिस पठाण, चांगदेव चव्हाण, अजित ठोळे,साईनाथ बनकर,पंढरीनाथ चव्हाण, कडु चव्हाण,गणेश कोकरे, गणेश देशमुख, गफुर पठाण, कचरू श्रीखंडे, आबासाहेब सरोवर, हिराचंद राजपूत, प्रकाश कोकरे विठ्ठल आघडे, कैलास आघाडे, ज्ञानेश्र्वर चव्हाण, गणेश मांडवगड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. प्रतिक्रिया:- अजय साखळे (शेतकरी )समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गांवर असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला एल अँड टी कंपनीने सरक्षक भिंतीचे काम चालू केले असून बहुतेक ठिकाणी तेही काम पूर्ण झाले आहे यामुळे मात्र शेतकऱयांना त्यांच्या शेतात शेतमाल नें आन करण्यासाठी व शेतीची मशागत व वाहने नें आन करण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता राहिलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने रस्ता सोडणे अकेक्सजीत असताना मात्र कुठेही रस्ता सोडलेला नाही त्यामुळे आज शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता मात्र रस्ता सोडण्याचा अधिकार एम एस आर डी सी ला असताना त्यांचा अधिकारी किंवा प्रतिनिधी आंदोलन स्थळी आला नाही मात्र एल अँड टी चे अधिकारी आले मात्र त्यांनी लेखी आश्वासन ण देता तोंडी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. डॉ. रणजित गायकवाड (अद्यक्ष, मावळा प्रतिष्ठान )शेतकऱ्यांना शसन स्तरावर निर्णय होईपर्यंत ठिकठिकाणी बांधच्या कडेवर दहा फूट जागा सोडण्याचे तोंडी आश्वासन एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यानी दिले आहे त्यामुळे तात्पुरता रस्त्याचा विषय मिटला आहे मात्र यानंतर रस्ते विकास महामंडळाकडे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे कायमस्वरूपी शेतात रस्ता जाण्यासाठी सोडावा अशी मागणी करण्यात येऊन ही मागणी पूर्ण ण झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल सुनील पाखरे (संचालक, बाजार समिती, लासूर स्टे) शेतकऱयांना कायम स्वरूपी रस्ता रस्ते विकास महामंडळाने द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी कायदेशीर व रास्त आहे मात्र त्यांचा अधिकारक्षेत्रात ही बाबा येत असताना त्यांचे कुठलेही अधिकारी आज शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी आले नाही उलट ज्यांच्या या प्रक्रियेत संबंध नसणारे एल अँड टी कंपनीचे अधिकारी आले व तोंडी आश्वासन देऊन निघून गेले हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसारा झाल्यासारखे आहे.