
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर :- विशेष साहाय्यक योजनेतंर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांचे लाभार्थी यांनी दि.३० जुन २०२२ पर्यंत २१ हजार रुपायांचे तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल करण्यात यावे नाही केल्यास सांगायो व श्रावणबाळ योजनेचे अनुदान बंद होणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयातर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे
विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांचे लाभार्थी यांनी शासन निर्णय दि.२० ऑगस्ट २०१९ अन्वये परिशिष्ट ६(६) (क) मधील तरतुदीनुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना कडुन दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर ज्या लाभार्थींचे अनूदान २१ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर मंजुर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाचे २१ हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणात देणे आवश्यक आहे.संजय गांधी निराधार योजनेतील विधवा, घटस्फोटीत,परितक्ता,दिव्यांग, अंतर्भूत पिडीत आजार व श्रावणबाळ योजना ब गटाच्या सर्व लाभार्थी यांनी येत्या ३० जुन पर्यंत त्यांचे २१ हजार रुपयांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागास किंवा तलाठी यांचे मार्फत सादर करावे असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी साहेब यांनी केले आहे जे लाभार्थी आर्थिक वर्ष २०२१ -२२ चे उत्पन्न प्रमाणपत्र येत्या ३० जुन पर्यंत सादर करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे तहसील कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे