
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: लातूर येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल
दिनांक 26/05/2022 गुरुवार ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे गेल्या एक महिन्यापासून घेण्यात अलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोप मा. आमदार श्री. अभिमन्यू पवार साहेब यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. कोविड-19 च्या नंतर मुलांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांमधील कला गुणांना वाव मिळावा यासाठी मा. श्री. रमेश बिरादार सर यांच्या संकल्पनेतून तब्बल एक महिना उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांना योगा, मल्लखांब, हॉर्स रायडिंग, गनशूटिंग, कबड्डी, मुलीचे स्वरक्षण व इतर मैदानी खेळ त्याच बरोबर इंग्रजी ग्रामर, हिंदी – मराठी हस्ताक्षर, गणित, विज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन मुलांना करण्यात आले. या शिबिरचा आनंद मुलांनी घेतला. या प्रसंगी मुलांनी विविध कलांचे प्रदर्शन मान्यवरांना दाखवले.
या वेळी प्रास्ताविक भाषणात श्री. रमेश बिरादार सरांनी उन्हाळी शिबीर घेण्याचा मुख्य हेतु हा मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व मुलांनी तो जोपासावा, असे मत मांडले. त्याच बरोबर शाळेनी सुरू केलेली स्वंय अध्ययन पद्धती बाबत सविस्तर मा- आमदार अभिमन्यू पवार साहेबांना सांगितली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. अनीता पाटील मॅडम यांनी शाळा मुलांना विविध कार्यक्रमातून स्टेज मिळवून देते त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो असे मत मांडले. त्याच बरोबर शाळेचे पालक मा- नितिन सुरवसे सरांनी उन्हाळी शिबिरबद्दल आपला अभिप्राय सर्व पालक व पाहुण्याशी शेअर केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. आमदार श्री. अभिमन्यू पवार साहेबांनी शाळा करत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. एका इंग्रजी माध्यमाची शाळा लाठी-काठी, मल्लखांब, योगा, घोडेस्वारी या सारखे भारतीय खेळ मुलांना शिकवते मुलांना मातीशी जोडून ठेवण्याचा पर्यन्त करते हे कौतुकच आहे. त्याच बरोबर अभ्यासातही मुलांचे हस्ताक्षर त्याचा कॉन्फिडंस, शिकवण्याची अभ्यास करण्याची पद्धती ही वेगळी असून यातून एक उर्जात्मक स्पर्धा निर्माण होते असे
मत मांडले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून उद्योजक मा. श्री. तुकाराम पाटील, संस्थाचलक मा. बाबुराव जाधव, तसेच सौ- संजीवनी बिरादार, यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांना या सर्व शिबिरात विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी रामेश्वर सगरे, मास्टर रविकुमार शिंदे, विठ्ठल गुरमे, विशाल कांबळे या प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले त्यांचेही सत्कार मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक मा. सुयश बिरादार, मा. सुजीत बिरादार, प्राचार्य पल्लवी जगताप, उपप्रचार्य किरण देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रामेश्वरी कदम, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु- मैथिली शिंदे व श्रेया भंडे या विध्यर्थिनीने केले तर आभार प्रदर्शन प्रा. पवार ज्योतीराम केले.