
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे आडगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवड बिनविरोध झाल्याबद्दल नुतन चेअरमन व संचालक मंडळाचा आझाद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने लोहा येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले.
यावेळी आडगाव येथील सेवा सहकारी सोसायटीचे नुतन चेअरमन मुरलीधर नागोराव क्षीरसागर, संचालक प्रकाश भीमराव क्षीरसागर, संचालक रघुनाथ रामराव क्षीरसागर, संचालक श्रीकृष्णा हैबतराव क्षीरसागर, संचालक बालाजी दशरथ वरपडे, संचालक काळेश्वर बोमनाळे , आदी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक रायफळे, तुषार बोंडारे, माणिक पवार, नागेश पाटील लोंढे, रूद्रा पाटील अभिमन्यू पाटील बसवदे,आकाश अनकाडे यांनी परिश्रम घेतले.