
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
विरोधकांनी विकास कामात खोडा घालू नये जनतेला पाणी मिळू द्यावे – पुंडलिकराव पाटील बोरगावकर
लोहा तालुक्यातील मौजे बोरगाव आ. येथील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाच्या जलजीवन योजने अंतर्गत पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आ. शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून व बोरगाव आ.चे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्या प्रयत्नामुळे बोरगाव आ. येथे शासनाच्या जलजीवन योजने अंतर्गत २ २५ कोटी रुपयांची योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागा मार्फत मंजूर झाली असून यांचे शासनाच्या अटी व नियमानुसार कायदेशीर टेंडर निघुन ते मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे सुनेगाव तलावात विहिरीचे काम सुरू झाले आहे पण गावातील काही उपद्रवी लोकांनी राजकारण करीत सदरील विहीरीचे खोदकाम थांबवा म्हणून प्रशासनाकडे तक्रार करून पेपरबाजी करून विकास कामात खोडा घालीत आहेत ते त्यांनी थांबवून जनतेला पाणी मिळू द्यावे असे आवाहन बोरगाव आ. येथील पॅनल प्रमुख पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
पुढे बोलताना पुंडलिकराव पाटील बोरगावकर म्हणाले की,
मौजे बोरगाव (आ.) ता. लोहा येथे सन 2020 – 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणुक पार पडली त्यात गावकऱ्यांनी खुप वर्षानंतर गावात सत्ता परिवर्तन केले त्यात गावकऱ्यांनी सर्व नवीन सदस्य बहुमताने निवडुन दिले त्यात महीला मागार्स्वीय सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडुण आले. भारत स्वतंत्रय झाल्यापासुन गावात एकही सार्वजनीक पाणी पुरवठा योजना नव्हती त्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण होत असे त्यात गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असे त्यामुळे गावातील व तांडयावरील सर्वसामान्य जनतेचे हाल होत असे व गावातील व तांडयावरील महीला, वृध्द व शाळकरी मुले यांना शेतातील विहीरीतुन डोक्यावर कोसो दुर पायपिट करुन पाणी आणावे लागत असे व गावात टँकर आले तर टँकरवर पाणी भरण्यासाठी लोकांची गर्दी होवुन तारांबळ उडत असे व पाणी भरण्याचे कारणावरुन वाद होत असे त्यामुळे नवनियुक्त सरपंच, उपसरपंच ,व सर्व ग्राम पंचायत सदस्य यांना सोबत घेऊन मार्गदर्शन व वेळोवेळी मदत करुन पॅंनल प्रमुख पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांनी सदरील योजना मंजूर केली . पुंडलिकराव पाटील बोरगावकर यांनी याअगोदर गावातील नागरीकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहुन त्यांनी मागील दोन वर्षेापासुन स्वता:चे विहीरीवरुन गावात पाईप लाईन आणुन गावात 70 ते 80 नळ देवुन मोफत पाणी पुरवाठ केला आहे. त्यानंतर निवनिर्वचीत सरपंच , उपसरपंच,सर्व सदस्यांनी गावातील कायमचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनचे जिल्हा परिषद नांदेड कडे पाठपुरावा करुन जल जिवन कार्यक्रम अंर्तगत नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन आणली त्याचे काम ऑन लाईन पध्दतीने कंन्ट्रक्शनला सुटले असुन सदर कंन्ट्रक्शन यांनी जिल्हा परीषद व जलसिंचन विभागाची परवानगी घेवुन विहीरीचे खोदकाम सुरु केले असुन शासनाच्या आंदाजपत्रकानुसार सदरील काम मुदतीत पुर्ण होणेसाठी काम जलद गतीने सुरु आहे. त्या कामावर जिल्हा परीषद नांदेड येथील अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. विहीरीचे खोदकाम सुरु झाल्यापासुन जिल्हा परीषदेच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. तसेच सदरील कामावर ग्रामपंचायत बोरगाव (आ.) ता. लोहा यांचे ही लक्ष आहे. दिनांक 17/05/2022 रोजी बोरगाव आ. येथील केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षाच्या तालुका लोहा शाखेच्या प्रसिध्दी प्रमुखांनी मा. जिल्हाधिकारी साहेब, नांदेड यांना निवेदन देऊन बोरगाव आ. येथील पिण्याचे पाण्याचे विहीरीचे काम सुनेगाव तलावात दिनांक 10/05/2022 रोजी पासुन चालु आहे. सदर विहीरीचे काम पुररेषा पाणी पतळी स्तरात चालु असुन तांत्रीक दृष्टया अयोग्य आहे. पावसाळयात विहीरीमध्ये पुराचे पाणी साचणार आहे. ते पाणी आरोग्याचे दृष्टीने हानीकारक आहे. तसेच सदरची जागा पाटबंधारे विभागाचे मालकीची असुन संबधीत विभागाकडुन न हरकत प्रमाण पत्र न घेता विहीरीचे खोदकाम सुरु आहे. अशा मजकुराचे निवेदन दिले असून सदरील निवेदनावरून दिनांक 26/05/2022 रोजी काही वृत्तपत्रात बातम्या प्रकाशीत झाल्या आहेत . सदरील निवेदन देणारा व्यक्ती हा काही जलतज्ञ नाही किंवा शासन – प्रशासना पेक्षा हुशार नाही तो तक्रार करण्यात बहादुर आहे गावातील विकास कामाबद्दल त्यांना काही देणे घेणे नाही.
.
मौजे बोरगाव आ. येथील जलजीवन कार्यक्रम अंर्तगत नळ पाणी पुरवठा योजना ही जिल्हा परीषद नांदेड यांचे निविदप्रमाणे सर्व विभागांच्या परवानग्या घेवुन सुनेगाव तलाव येथे विहीर खोदकाम सुरु आहे. सदरील विहीर ही तलावाचे पुर पातळी पासुन उंचीवर आहे. तसेच सदर विहीरीचे बांधकाम पुर पातळीचे वर होणार असल्यामुळे सदर विहीरीत पुराचे पाणी जाणार नाही. निवेदनकर्ता यांनी हेतुपुरस्सर, जाणीव पुर्वक किंवा योजनेच्या कंन्ट्रक्शन कडुन स्वता:ला काही अर्थीक लाभ व्हावा या उददेशने किंवा गावातील राजकीय विरोधाक या हेतुने मा. जिल्हाधिकारी , नांदेड यांना निवेदन दिले आहे.
तरी ह् लोकांच्या रोजच्या जिवन मरणाचे समस्या असलेली पिण्याचे पाण्याची योजना सर्व शासकिय विभागांच्या परवानग्या घेवूनच विहीरीचे खोदकाम सुरु आहे सुनेगाव तलाव क्षेत्रात विहीरीचे खोदकाम चालू आहे. त्यास गावातील एक जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे विकास कामात खोडा घालू नये.
यह पब्लिक है सब जानती हे असे पॅनल प्रमुख पुंडलिकराव पाटील बोरगावकर म्हणाले.