दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
लोहा:- येथुन जवळच असलेल्या कारेगाव येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भिम जयंती मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नालंदा बौध्द विहारात भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षीका अॅड.चित्रलेखा कांबळे यांच्या मंगलमय हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प पुजा करण्यात आली व त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. आणी यानंतर दरवर्षी प्रमाणे भिम जयंती मिरवणुक मार्गाने पणती ज्योत रॅली काढण्यात येउन शांततेत विसर्जण करण्यात आली. यावेळी अॅड.चित्रलेखा कांबळे यांनी तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जिवन चरीत्रावर दोन तास अनमोल असे प्रवचन दिले.व प्रवचना नंतर खिरदान करण्यात आली.यावेळी बुध्द जयंती कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष अनिलदादा गायकवाड,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल हंकारे,बामसेफ कर्मचारी संघटनेचे मराठवाडा सचिव देवानंद हंकारे,विजय गायकवाड,संतोष गायकवाड,चांदु गायकवाड,प्रदीप हंकारे,प्रदीप गायकवाड,गोपिनाथ गायकवाड,मंगेश गायकवाड,निवृती गायकवाड,नारायन गायकवाड,ग्रां.पं.सदस्य सुभाष हंकारे,दीलीप कदम,विकास हंकारे,सुरेश हंकारे,विशाल गायकवाड,विशाल हंकारे,संजय गायकवाड,अक्षय गायकवाड,नामदेव गायकवाड,भगवान तिगोटे आदींनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी केले.


