
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे.
काळे कॉलनीत गेल्या पाच वर्षापासून उघड्यावर ड्रेनेज लाईनचे मैला मिश्रीत पाणी वाहत होते,अनेक नागरिकांच्या घराच्या पाठीमागे व घराच्या पुढे ही मैलामिश्रीत घाण पाणी वाहात असे,अनेक वेळा काळे कॉलनीतील नागरिकांनी नगरपरिषदमध्ये जाऊन तक्रार हि दाखल केली होती,पण ड्रेनेज लाईन काम करण्यास पालिकेचे सी.ई.ओ.अंकुश जाधव तयार होते. त्यांनी एक वर्षापुर्वी कामही मंजूर केले होते, पण पुढे ड्रेनेज लाईन घेऊन जाताना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे व नगरसेवक अँड सचिन काळे यांची खाजगी मालमत्ता असल्यामुळे त्या मालमत्तेतून नगर परिषद ड्रेनेज लाईन घेऊन जाऊ शकत नव्हते. खाजगी जागा मालकांनी त्यांना कडाडून विरोध केला होता. दोन वर्षापूर्वी मानवी हक्कांचे संरक्षण जागृतीची शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी नगराध्यक्षा व सी.ई.ओ व नगराध्यक्षा उमरगेकर यांना ही निवेदन देऊन वर्तमानपत्रातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप जोगदंड केला , त्यांनी सतत दोन वर्षे नगरपरीषदेकडे पाठपुरावा केला ,परंतु त्यांच्या पाठपुराव्याला यश आले नाही, शेवटी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे व अँड सचिन काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी केली त्याच वेळी काळे काँलनीतील सर्व नागरिक एकत्र येऊन सर्वांनी नागरी समस्या त्यांच्या समोर मांडल्या व मैलामिश्रीत पाण्याचा ही प्रश्न त्यांच्यासमोर मांडला ,प्रत्यक्ष पाहणीनंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले.त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी आपल्या खाजगी जागेतून स्वखुशीने पाईप लाईन घेऊन जाण्यासाठी नगरपरिषदेस परवानगी दिली. नागरिकांनी आनंद व्यक्त करून सुटकेचा श्वास सोडला. त्याच वेळी उद्घाटन मा. नगरसेवक अँड सचिन काळे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे , मानवी हक्क संरक्षण आणि जागृती शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दीपक काळे, नगरपरिषदेचे अभियंता सचिन गायकवाड ,अँड आनंत काळे ,सा.का.आसाराम गरड यांच्या हस्ते शुभारंभ करून काम चालू केले.
यावेळी नगरसेवक अँड सचिन काळे ,दीपक काळे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, अभियंता सचिन गायकवाड, अँड अनंत काळे, सामाजिक कार्यकर्ते आसाराम गरड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे, संदीप काळे, दत्ता चौधरी ,महादेव पाटील, गुलाब व्यवहारे,लक्ष्मण गवळी, भरत गोरे,अनिल मोकाशे, किरण पांचाळ ,अक्षय तापकीर ,राजन काळे,आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.