
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि. 27 मे 2022 रोजी मा. राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष मा. सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. दिपक भैया जयस्वाल राष्ट्रवादी काँग्रेस नगर सेवक बबलू भैया दिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉ. प्रियदर्शनी इंगळे सुनील दहेगावकर यांच्या माध्यमातून शरदभाऊ पाईकराव घुग्घुस शहर महासचिव यांच्या नेतृत्वात मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले की घुग्घुस शहर मध्ये चाळीस ते पन्नास वर्षा पासुन राहात असलेले अमराई प्रभाग क्रमांक 10, 11 उडीया मोहल्ला ते तिलक नगर, प्रभाग क्रमांक 9 दोननंबर, तसेच प्रभाग क्रमांक 3 शिव नगर, शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 6 शांती नगर, असा बऱ्याच घुग्घुस रहिवाशीयांना पक्के घर पट्टे नसल्याने नागरीकांना घरकुल व मातारमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही पक्के घर पट्टे नसल्याने त्यांना पक्के घर बनविण्यासाठी सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे ते आज पन काम कष्ट करून माती गोठ्याने बांधलेल्या कच्च्या घरात राहतात त्यांच्याकडे आज पण पक्के पट्टे नाहीत घुग्घुस नगर परिषद अमलात आली तेव्हा पासुन नागरिकांना घर विक्री व खरेदी करण्यास अडचण येत आहे व त्यांच्याकडे पक्के पट्टे नसल्यामुळे त्यांना घर बांधण्या करीता लोन सुद्धा मिळत नाही या सर्व बाबींचा विचार करून घुग्घुस वाशियांना येत्या 15 दिवसात पक्के पट्टे देण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून घुग्घुस नगर परिषद च्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा घुग्घुस शहर महासचिव शरदभाऊ पाईकराव यांनी दिला निवेदन सादर करताना घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पिटलवार
घुग्घुस शहर महासचिव शरद म. पाईकराव रितिक मडावी सोनल बल्की गुंडेटी अशोक आसमपल्लिवार जगदीश मारबते राकेश पारशिवे अशोक भगत दत्ता वाघमारे आदित्य सिंह ओम डोरलिकर गौतम ब्राह्मणे उपस्थित होते.