
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: प्रत्येक जण आपले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. ते प्रयत्न कधी सफल होतात किंवा काही कारणास्तव होत नाही. परंतु त्यावरती आपण मात करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. जो मात करतो, मार्ग शोधतो तोच यशाच्या नवीन शिखरापर्यंत जातो. हेच प्रत्यक्षात घडवून आणले आहे.पिपरी-चिंचवड मधिल एका सायकल रिपेरिंग करणार्या तरुणाने प्रत्यक्षात घडवून आणले आहे. त्या तरुणाचे नाव विजय रमेश साळवी यमुनानगर मधुरा हौसिंग सोसायटी निगडी येथे राहायला आहे. या तरुणाचे मुळगांव सोनई अहमदनगर जिल्ह्यातील गेली अनेक वर्षे वडील बजाज कंपनीत नोकरीला असल्यामुळे हे कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. रुपीनगर निगडी यमुना नगर या भागात त्याचे छोटसं सायकल रिपेरिंग दुकान आहे. हे दुकान पण साधं रस्त्याच्या बाजूला एका टपरी मध्ये चालवत आहे. दिवसातून दोनशे ते अडीचशे रुपये त्याला मिळतात. त्यातून तो आपली रोजी रोटी चालवतो. त्याचे शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या जिवन शिक्षण विद्या मंदिर रुपीनगर निगडी येथे झालेले आहे.वडिलाची नोकरी १९९० साली गेली.त्यामुळे घरात अर्थीक चणचण भासू लागली त्यामुळे सेक्टर नंबर २१ निगडित यमुनानगर मध्ये एक छोटं सायकल रिपेरिंग दुकान चालु केले. त्या दुकानाचे नाव प्रिन्स सायकल मार्ट ठेवले.तिथून पुढं त्याचे दुकान हळूहळू चालत गेले.शिक्षण जेमतेम सातवी असल्याने त्यामुळे नोकरीची उत्तम संधी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या मनात अनेक वर्षापासून खंत होती की आपण उच्चशिक्षित बनावे परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. तो सायकल दुकान चालवत असल्याने त्याच्याकडे यामुनानगर पिंपरी-चिंचवड या भागातून अनेक सायकल रिपेरिंग करण्यासाठी त्याच्याकडे येत असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात त्याचा मोठा परिचय आहे. त्यातून मार्ग शोधत त्याने आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग शोधला.त्याला वाचण्याची आवड असल्याने त्याने न्यू नाईट स्कुल सदाशिव पेठेत सन २००० मध्ये बाहेरून इयत्ता १० वी ची परीक्षा दिली. परंतु त्यात पण तो अनुत्तीर्ण झाला.पंरतु शिक्षण घेणं त्याने थांबवले नाही. त्याने आपले पूर्ण शिक्षण करण्याचा मार्ग शोधला व पुढे आयटीआय इलेक्ट्रिकल कोर्स केला. २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. या कालावधीत त्याला एका आयकर अधिकाऱ्याची व ख्रिस्ती धर्मगुरूचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी त्या तरुणाला वेळोवेळी कपड्यांची जेवणाची व पाहिजे ती मदत केली.म्हणुन विजय साळवी या तरुणाने बी.ए.चे शिक्षण २०१४ मध्ये पूर्ण केले. नंतर २०१५ मध्ये ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बाहेरून एम. ए. ला प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम २०२१ मध्ये पूर्ण केल्यानंतर विजय साळवी पदवीत्तर झाल्याचे समाधान त्याला वाटू लागले. दरम्यान २०१२ मध्ये भक्ती शक्ती या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला सुरू असताना संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जिवनावर आधारित व्याख्यान केले.त्याचा प्रभाव विजय साळवी या तरुणावर पडला. त्याने विचार केला की अण्णाभाऊ साठे एवढ्या कठीण परिस्थितीत हे दिड दिवसाची शाळा शिकुन कादंबऱ्या, कथा पोवाडे, लावणीकथ्थक, पुस्तके हे साहित्य लिहू शकतात तर आपण आजच्या काळात सर्व प्रकारच्या सुविधा असुन आपण सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले आपण काय करू शकत नाही. याची प्रेरणा विजय साळवी या तरुणाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानातून त्याला प्रेरणा मिळाली.सायकल रिपेअर करणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए.झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मान्यवर सह मित्र परिवाराने त्याचे कौतुक केले आहे.व त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे. आज हा तरुण एका कंपनीत काम करतो.त्याचे मराठी, हिंदी इंग्रजी या तीन भाषांवर प्रभुत्व आहे. आपण एम. ए. झाल्याचे श्रेय आपल्या वडिलासह एका आयकर अधिकाऱ्याला व ख्रिस्ती धर्मगुरूला दिल्याचे दैनिक चालु वार्ताशी प्रतिक्रिया देताना सांगितले.