
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जोमेगांव ;- लोहा तालुक्यातील जोमेगांव येथे इतिहासाच्या कालपटलावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणार्या ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे. तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या आणि अंधारलेल्या वाटेत प्रकाशाचा मार्ग दाखवणार्या स्त्रीयांना स्वकर्तृत्वाची जाणीव करून देणार्या अखंड समाजाच्या प्रेरणामुर्ती, त्याग मुर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी प्रभाकर शिंदे (सरपंच) मनोहर भुरे (उपसरपंच) मारोती पांचाळ (पो.पा.) पुरभा शेटे , जयंत गव्हाणे, आदिनाथ पाटील , पंडित कापसे, दिगंबर शिंदे (चेअरमन) देवानंद कमजळे, मालू कमजळे, अंतोश शेटे,भास्करराव पाटील जोमेगांवकर व ग्रामपंचायत सदस्य, गावातील लहान थोर मंडळी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.