
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) पिंपरी ते महाड येथे एकदिवसीय बुद्धलेणी संवर्धन समितीच्या वतीने मोफत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान हि कार्येशाळा दि,५ जुन रोजी आयोजित करण्यात आली आहे.या कार्येशाळेत बुद्ध कालीन सुवर्ण इतिहास, विविध बुद्ध स्थळांची माहिती, सुमारे २००० वर्षांपूर्वीचा धम्माचा काळ, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बुद्ध लेण्यांना भेटी, या कार्येशाळेत घेतल्या जाणार आहे.दरम्यान या कार्येशाळेत ६५ नामांकित व्यक्तींची निवड आयोजन समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे.त्या नामांकित व्यक्तींची प्रवास व भोजनाची व्यवस्था लेणी संवर्धन समिती करणार आहे. अशी माहिती बुद्ध लेणी संवर्धन समिती पिंपरी यांनी दिली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी जी क्रांती घडवली ती आजही इतिहासात अजरामर आहे. आजही पाणी पित असतांना पाण्याच्या घोटाला आठवण आल्याशिवाय राहत नाही.असे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.असे लेणी संवर्धन समितीने एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. याच क्रांतिभूमी महाड परिसरात अनेक प्राचीन बुद्ध लेण्या आहेत. त्या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील महत्त्वाच्या बौद्ध लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यामध्ये प्रामुख्याने कोलबुद्ध लेणी,महाडचे चवदार तळे, गंधारपाले लेणी, या महत्त्वाच्या स्थळाला भेटी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने इतिहास समजावून घेण्याची प्रथम संधी पिंपरी-चिंचवडकरांना दि,५ जून रोजी मोफत मिळणार आहे.