
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
प्रमुख उपस्थिती मा श्री उद्योजक उत्तमराव वाघ नेते राष्ट्रवादी व मा श्री सुमित भैया वाघ युवा नेते राष्ट्रवादी
चाकूर तालुक्यातील मौजे कलकोटी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया वाघ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
तसेच राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी मंचावर उपस्थित विविध मान्यवरांचा जयंती संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सुमितभैया वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा आदर्श व विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करुन आदर्श राज्यकारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून अहिल्याबाईकडे पाहिले जाते.त्यांनी अनेक मंदीरे बांधून जीर्णोधार केला.धर्मशाळा बांधल्या,
अन्नछत्रे उघडली,आश्रयशाळा उभा केल्या, दानधर्म करणे,
गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करण्याचे नित्यक्रम चालू असल्याचे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते गणपत नितळे,राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,सामाजिक न्याय सेलचे विष्णू तिकटे,श्री विश्वनाथ येडके,अंकुश बोमदरे,तंटामुक्ती अध्यक्ष पांडूरंग नेवाळे,ञ्यंबक पाटील,गंगाधर वाडकर,वसंत थावरे,नरसिंग मुरके जयंती समितीचे नामदेव नितळे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.