
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर – आमदार प्रशांत बंब यांच्या सहकार्याने व माजी सभापती संतोष पाटील जाधव यांच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी वजनापूर/शेकटा येथे असंघटित कामगार व शेतकरी , शेतमजूर यांचा वजनापूर येथील शांतीप्रसाद फार्मर ऍग्रो प्रोड्युसर कंपनी कार्यालयात मेळावा घेण्यात येऊन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरिकांच्या आरोग्यासाठी घरातला कचरा घरातच एकत्र करून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मोफत कचरा कुंडी वाटप , भारतातील असंघटित कामगारांना आर्थिक सहाय्य करणेसाठी इ श्रम कार्ड वाटप , महाराष्ट्र बांधकाम कामगार इमारत मंडळ तर्फे सुरक्षा किट वाटप , तसेच गरीब पात्र लाभार्थ्यांना मोफत इलाज साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हेल्थ कार्ड वाटप , त्याच प्रमाणे कृषी विभागातर्फे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी- एक गाव , एक वाण – या उपक्रमाअंतर्गत 250 हेक्टर साठी 100 शेतकऱ्यांची नाव नोंदणी करून मोफत बियाणे , खत , औषधी वाटपासाठी गावाची निवड करणे सह संजय गांधी श्रवण बाळ योजनेतील पात्र , गरजू लाभार्थी यांचे प्रस्ताव पाठवणे .जवळपास 400 लाभार्थी यांना इत्यादी साहित्य वाटप करून वजनापूर शेकटा गावासह शिल्लेगाव व गाजगाव सर्कल मध्ये गेल्या 10 वर्षा पासून शासनाच्या विविध राबवत असलेल्या योजनेची अंमलबजावणी करनेसाठी शासनाचा पाठपुरावा करणार स असल्याचे ही जाधव यांनी या वेळी संगीतले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते