
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावांकरिता लाखो-करोडो रुपये निधी वितरित केल्या जातो.अन तो निधी नागरिकांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो.मात्र,त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.
अमरावती :- “स्वच्छ भारत-स्वछ शहर” चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासन कडून आवाहन करण्यात येवून शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.मात्र,अंजनगाव सुर्जी शहराची वाटचाल ही तेव्हढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्वच्छतेवर किती खर्च होतो?मात्र,अंजनगाव सुर्जी शहरात निधी तर मिळतो मात्र;तो निधी स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो.हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते.अंजनगाव सुर्जी शहरातील अनेक भागातील नाल्या ह्या घाणीने तुडूंब भरलेल्या आहे.तर काही ठिकाणचा कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करत आहे.
अंजनगाव सुर्जी शहरातील न.प.कार्यालयात सद्यस्थितीत प्रशासकीय राजवट असून प्रशासनाकडून शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी घाण व कचरा हे प्रशासक स्वच्छतेबाबतीत किती जागरूक आहे हे दाखवून देते.
आता पावसाळा तोंडावर येत असतांना नागरिकांच्या जीवीत्वाशी खेळण्याच्या चालत आलेल्या या प्रकाराला काय म्हणावे?अन या प्रकाराला जबाबदार कोण?हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनाने ठोस कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे.