
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि – जब्बार मुलाणी
“अहिल्यामाई होळकर जयंती” निमित्त भिगवण मध्ये शिवसेना जनसम्पर्क कार्यालया मध्ये त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .त्या निमित्ताने भिगवण मधील महिला कार्यकर्त्या नितल चिंचोळे व त्यांच्या सहकार्यानी महिला तालुका सुरेखा लोहार यांना पाचारण केले परंतु त्या कमी रक्तदाबाच्या आजाराने त्रस्त असल्या मुळे येऊ शकणार नव्हत्या तरीही कार्यकर्त्यांचा जास्त आग्रह झाल्याने सुरेखा लोहार यांनी त्या महिलांची मर्जी राखून व “शिवसेना वाढीसाठी मी कोणत्याही परीस्थिमध्ये येऊन कार्यकर्त्यांची मने राखून कार्यकर्ते वाढवणारच ” असे विचार मांडले.त्यांच्या सोबत उपतालुका संघटिका ज्योती गाढवे ही या कार्यक्रमास हजार राहिल्या
कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर भिगवण मधील महिला कार्यकर्त्या नितल चिंचोळे व त्यांच्या सहकारी असणाऱ्या महिला कारकर्त्याना घेऊन भिगवण गावामध्ये घरोघर फिरून महिलांच्या आडीआडचणीची चौकशी करून ,”कोणाला कसली अडचण असेल तर आमच्या महिला कार्यकर्त्यां कडे संर्पक सादावा तुमच्या समस्या नक्कीच दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करू” असे वचन त्यानी महिला मंङळाना दीले
कार्यक्रमास भिगवण मधील शिवसेना भिगवण शहर प्रमुख रामचंद्र पाचांगणे,उपतालुका प्रमुख फिरोज पठाण,युवासेना जिल्हा समन्वयक अँड. राहुल बंडगर तसेंच महिला तालुका प्रमुख सुरेखा लोहार,उपतालुका प्रमुख ज्योती गाढवे, भिगवण संघटिका शोभा काळे ,नितल चिंचोळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .