
दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
होळकर अहिल्याबाई (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झालापहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी ‘ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती.
अहिल्याबाई न्यायदानासाठी विशेष ओळखल्या जातात. सार्यांना समान न्याय मिळेल यासाठी त्या विशेष लक्ष देत होत्या. एकदा संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्यालाही तुरुंगात डांबण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. अहिल्याबाईंचे राज्य हे कायद्याचे राज्य होते त्यामुळे जनता समधानी होती. कदाचित म्हणून पुढे त्यांना संताच्या दर्जाप्रमाणे पुजलं जाऊ लागलं. अनेक अनिष्ट प्रथा, परंपरांना विरोध करत त्यांनी नवनिर्माण केले होते.
जयंती उत्साहात सर्व जाती धर्माच्या लोकांनी भाग घेतला.शिवाजी देशमुख. कलीम अत्तार. राजेश देशमुख,मदन जंजाळ,राजू धनावत, नितीन कुटुंबरे, गजू सपकाळ, गणेश भवटे, जावेद अत्तार, हे उपस्थित होते.