
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
मा. कवी चंद्रकांत जोगदंड व कवी आत्माराम हारे आयोजित पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन व पुरस्कारसोहळा स्वारगेट, पुणे येथील मराठा चेंबर्स सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी समीक्षक, लेखक श्री. एम् . एस् . जाधव तथा कवी बाबा जाधव यांंच्या ‘भूक’ या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक परीघातील विविध समस्यां आणि विषय त्यांनी काव्य स्वरूपात गुंफन केल्याबद्दल सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष मा. प्रकाश देशमुखसर कराड , ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मा.बबन पोतदार कवीसंमेलनाध्यक्ष मा. पापालाल पवारसर धुळे, संमेलन उद्धघाटक मा. दत्तात्रय कल्याणकर, प्रमुख उपस्थिती मा. प्रा. व्यंकटराव वाघमोडे, बाबा ठाकूर, प्रा. राम जाधव, मा. प्राचार्य हनुमंत धालगडे, कथाकथनकार प्रा. शांतीनाथ मांगले , आयोजक कवी मा. चंद्रकांत जोगदंड व कवी आत्माराम हारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लेखक एम्. एस् . जाधव तथा कवी बाबा जाधव यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.