
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल आता खेळण्यातील वस्तू होत आहे.महत्वाच्या कामासाठी केलेला एक फोन हा वारंवार हॅलो हॅलो करून बंद होत आसल्याचे निदर्शनास येत आहे.अपुऱ्या नेटवर्क अभावी ऐक्या जागेवर उभा असलेला व्यक्ती आता नेटवर्क मिळवण्यासाठी धडपड करत आसल्याचे दिसत आहे. बदलत असलेले रिचार्जचे दर यामुळे सर्व कंपन्यांचे ग्राहक हे अगोदरच त्रस्त असताना नेटवर्कच्या अडचणीने आणखी त्यात भर टाकली आहे.फोन चालू असताना अचानक पने दोन व्यक्तींमधील आवाज हा नेटवर्क मुळे बंद होऊन फोन कट होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये गैर समज निर्माण होत आसल्याचे चित्र दिसत आहे.मानवी जीवनामध्ये फोन चा वापर हा संदेश वहनासाठी महत्त्व पूर्ण असून नेटवर्क चे संकट हे त्यास ग्रहण असल्याचे सांगितले जात आहे.गगन चुंबी टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर्स हे आधुनिक तंत्रज्ञानाची साक्ष जरी देत असेल तरी नेटवर्क अभावी ते शोभेच्या वस्तू असल्याचे ग्राहकांमधून बोलले जात आहे.त्या मुळे जिओ कंपनी सहित सर्व टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी ज्या प्रमाणे जीचार्ज दर वाढवले त्या प्रमाणे सुविधा देण्यात याव्या असे तालुक्यातील ग्राहकांमधून बोलल्या जात आहे.