
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – तालुक्यातील मालुंजा ते जिकठाण रोड वरील कनकोरी येथील नारळी नदीवरील सुरू असलेल्या
निकृष्ट दर्जाचे पुलाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्या विरोधात कार्यवाही करून सदरचे पुलाचे काम अंदाज पत्रकानुसार करुन जो पर्यंत काम अंदाजपत्रक प्रमाणे होत नाही तो पर्यंत बिल अदा करु नये अशी मागणी
कोळघर, कनकोरी, दिघी, मालुंजा येथील ग्रामस्थांनी गंगापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या कडे निवेदनात करण्यात आली आहे
गंगापूर तालुक्यातील मालुंजा ते जिकठाण या रस्त्यावरील कनकोरी येथील नारळी नदीवरील पूल
मागील अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्यामुळे आठ ते दहा गावातील संपर्क तुटला होता. याची शासनाने दखल घेत
शासनाने जवळपास ४६ लक्ष मंजूर होऊन त्याचा ठेका गुत्तेदारास देण्यात येऊन प्रत्यक्षरित्या पुलाचे काम सुरू होऊन दोन महिने उलटले, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, अंदाजपत्रकानुसार न
करता संबंधित बांधकाम विभागाच्या मिली भगत मुळे संबंधित ठेकेदार पुलासाठी लागणारे दगड हे खदानीचा
न वापरता विहिरीचा दगड वापरुन, तसेच गावातील नारळी नदीवरील माती मिश्रित वाळू आणि स्टीलचा वापर न करता मनमानी पद्धतीने या पुलाचे काम सुरू असून निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम होत असल्यामुळे पहिल्याच पावसात पूल वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नसून जोपर्यंत पुलाचे काम
अंदाजपत्रकानुसार होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे एक पैसाही बिल अदा करू नये. अन्यथा संबंधित बांधकाम
विभागाच्या कार्यालयासमोर वरील गावातील ग्रामस्थ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा रामेश्वर पवार ,शिवाजी पवार, रामदास पवार ,प्रशांत पवार, बाबासाहेब पवार, सतीश डेडवाल, अर्जुन पवार, सुनील पवार, शिवाजी पवार, राम गवळी, काकासाहेब पवार, विशाल पवार, परविन काळे, चंद्रकांत डव्हाण, बापू पवार, धरमचंद्र राजपूत ,रामनाथ शिंराळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे