
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका सराईत गुन्हेगारांस भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून गोपनीय माहिती वरुन रंगेहांत पकडले भारती विद्यापीठ पोलिसांनी एक लाख ८५ हजार रुपयांची चोरलेली चार वाहने जप्त केली त्यामध्ये एक रिक्षा व तीन दुचाकी यांचा समावेश आहे. सचिन सुरेश चिंतामणी वय ३७ रा. सच्चाई चैन मंदिराजवळ कात्रज असे या ताब्यांत घेण्यांत आलेल्या सराईत गुन्हेगारांचे नाव आहे. पोलीस कर्मचारी विक्रम जाधव व विक्रम सावंत यांना मिळालेल्या माहितीवरुन की सराईत वांझोटा चिंतामणी चैन मंदिर कात्रज परिसरांत राहत असून एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरुन फिरत असल्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता व नितीन शिंदे यांच्या पथकांने सापळा रचून सराईत गुन्हेगार आरोपी चिंतामणी याला ताब्यांत घेवुन त्याला पोलिसी खाक्या दाखवतांच त्याने तीन दुचाकी व रिक्षा चोरल्यांची कबुली तपासी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तपासा दरम्यान त्याच्याकडूंन इतर वाहने जप्त करण्यांत आली ती त्याने शहरातील विविध भागातून चोरी केल्यांचे पोलिसांना सांगितले सदरची कामगिरी मा. सागर पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त,श्री.जगन्नाथ कळसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव पोलीस उपनिरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखांली तपास पथकांचे अंमलदार रवींद्र चिप्पा,गणेश भोसले , अभिजीत जाधव गणेश शेंडे, राहुल तांबे आदी पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभाग घेतला.