
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
नंदनवन तालुका कंधार येथील युवक शिवराज पवार यांची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
आपण पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्यरत राहाल, असा आम्हाला विश्वास आहे असे धनंजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नांदेड यांनी सांगितले.
निवडीचे पत्र देताना माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे सोबत हरिहर भोसिकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , वसंत सुगावे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,धनंजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस ,कल्पनाताई पाटील, भगवान पाटील आलेगावकर उपस्थित होते.
निवड झाल्याबद्दल त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.