
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- ऊस तोड कामगाराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री हा प्रवास थक्क करणारा विस्मयाने बोटे तोंडात घालायला लावणारा आहे. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी 1986 साली गोपीनाथ मुंडे यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि या संधीचे गोपीनाथ मुंडे यांनी सोनें केले.
महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारण्यांना शह देणारा बहुजनाचा एक बलवान नेता अशी मुंडे ची प्रतिमा निर्माण झाली. केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्यानंतर आपल्या गावचा सत्कार स्वीकारण्यासाठी गोपीनाथ मुंडे निघाले असता नियतीने घाला घातला व संबंध बहुजनांचा नेता हिरावून नेला. अशा शब्दांमध्ये बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित पुण्यतिथी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संचालक अमरदीप हाके,बाळासाहेब होळकर, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे,श्री पांढरे सर, भिसे, कालिदास पिटाळे,बालाजी देवक्तते, शिद्राम मासोळे, संतोष लातुरे, गणेश यामगिर,सतीश केंद्रे, मंगेश चव्हाण,शरण हॅन्डराळे, मंगेश पोले,संग्राम सुरणर आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.