
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
७५० विद्यार्थ्याची नामांकित कंपनी मध्ये निवड
——————————————-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे अप्रेसिएशन अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला
अमरावती :-पी.आर.पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिटयूट चा बहुचर्चित ऑफर लेटर डिस्ट्रिब्युशन २०२२ शनिवार दिनांक ४ जुन २०२२ ला सायंकाळी ५ वाजता पी.आर.पोटे पाटील रोड,येथील स्वामी विवेकानंद ऑडिटोरिअम पी.आर.पोटे ग्रुप कॅम्पस मध्ये ४ हजार विद्यार्थ्याच्या उपस्थितीत संपन्न झाला.या सोहळयाला मुख्य अतिथी म्हणून पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री.प्रवीण पोटे पाटील,पी.आर.पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमॅट चे प्राचार्य डॉ.डी.टी.इंगोले,उपप्राचार्य डॉ.मोहम्मद झुहेर,पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व विभाग प्रमुख व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख कॉरपोरेट डीन प्रा.मोनिका जैन व संपूर्ण टीम उपस्थित होते.
पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपचे प्राथमिक उद्दिष्ट विद्यार्थ्याना उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देण्याचे आहे.याच अनुषंगाने स्वातंत्र्य भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सुद्धा विविध नामांकित कंपनीमध्ये निविड झालेल्या ७५० विदयार्थ्यांचे कौतुक ऐंप्रिसिएशन अवार्ड देऊन करण्यात आले.
पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपची ओळख विदर्भ मध्ये सर्वाधिक प्लेसमेंट देण्यासाठी आहे.संस्थेच्या अवघ्या दशकाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यीना मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपनीजमध्ये रोजगार पी.आर.पोटे पाटील ग्रुपमध्ये विविध कॅम्पस ड्राइव्ह आयोजित केल्यामुळे मिळाला आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थिती मध्येही महाविद्यालायाद्वारे मोठया प्रमाणात विद्यार्थ्याना प्लेसमेंट दिले हा संस्थेचा एक नवा विक्रम आहे.यावर्षी सुद्धा ७५० विदयार्थ्याना आपल्या महाविदयालयाद्वारे रोजगाराचे ऑफर्स प्राप्त झाले व पी.आर.पोटे पाटील ग्रुप विदर्भातील एकमेव एज्युकेशनल ग्रुप जिथे १३० पेक्षा जास्त कंपनीजचे कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या संपन्न झालेत तसेच पी.आर.पोटे पाटील हा एकमेव एज्युकेशनल ग्रुप आहे कि येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग ,इलेकट्रीकल इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजिनिअरिंग अश्या कोअर ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देण्यात आल्या व सर्व विद्यार्थ्याचे प्लेसमेंट नामांकित कंपनीत झाले असे संस्थेचे अध्यक्ष श्री.आ.प्रवीण पोटे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात संगितले.तसेच विद्यार्थ्याच्या प्लेसमेंट करीता पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप सदैव तत्पर असून भविष्यात संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याना नामांकित कंपनीचे ऑफर लेटर मिळतील या उद्देश्याने ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग काम करीत असल्याचे हि त्यांनी सांगितले.
पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल गुपच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे नागपूर,पुणे,मुंबई तसेच हैदराबाद येथे कॉपोरेट ऑफिसेस असल्यामुळे नियमित रोजगाराच्या संधी विद्यार्थ्याना उपलब्ध होत आहेत असे प्रा.मोनिका जैन,डीन कार्पोरेट रिलेशन यांनी सांगितले.तसेच विद्यार्थ्याच्या प्रगती करीता संस्थेद्वारे अभियांत्रिकी बरोबरच फार्मसी,ऍग्रीकल्चर,आर्किटेक्चरच्या विद्यार्थी करिता बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत असल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या संवादामध्ये विद्यार्थ्याना संबोधित केले.
पी.आर.पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यावर घेतलेल्या परिश्रमामुळेच महाविद्यालयाने प्लेसमेंटचा उच्चांक गाठला आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक विधर्थ्यांना रोजगार देण्याच्या ध्येयापर्यंत येत्या वर्षामध्ये आपण नक्की पोहचू असे आश्वासन यावेळी पी.आर.पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.डी.टी.इंगोले यांनी बोलतांना उपस्थितांना दिले.त्याचप्रमाणे प्लेसमेंट सोबतच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा पी.आर.पोटे पाटील महाविद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी असल्याचे प्राचार्य डॉ.डी.टी.इंगोले यांनी सांगितले.
या ऑफर लेटर डिस्ट्रिब्युशन सोहळ्या दरम्यान कंपनीमध्ये निवड झालेल्या काही विद्यार्थी तसेच पालकांनी संस्थेद्वारे विद्यार्थ्याच्या प्लेसमेंट करीता करून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच या विविध उपक्रमांचा प्लेसमेंट दरम्यान कसा फायदा झाला याबाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने अंतीम वर्षाला असणाऱ्या विध्यार्थीकरीता विविध ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येते.या बरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्याना टाटा कंन्सल्टन्सी सर्विसेस,कॅपजेमिनी,पर्सिस्टन्ट,ऐंक्सेनचर,कोलाबेरा,प्लॅनेटस्पार्क,विप्रो,इन्फोसिस,एच.एस.एम एडिफाड्स केपीआयटी,व्हर्चुसा,माइंडट्री,झेन्सा,परफिशिअंट,ग्लोबल लॉजिक,इन्फोसेप्ट,एचसीएल,एल अँड टी इन्फोटेक,एडीपी,टेक महिंद्रा,निओसॉफ्ट,बिटवाईस,एस.बी.कॅप,ट्युडीप टेकनॉलॉजी,टेकइन्फिनि,टिटेक,फेस तसेच इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विद्यार्थ्याकरिता त्रिवेणी टर्बीईन्स,इलेक्ट्रो न्यूम्याटिक,सतीश इंजेकटोप्लास्ट,नोबेल हायजिन,एचएसएम एडिफाइस,या कंपन्यांचे ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
प्रोग्रॅमच्या सर्वात शेवटी विद्यार्थ्याचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता ७५० प्लेसमेंट रेकॉर्डचा केक विद्यार्थ्यासमवेत कापण्यात आला.तसेच अंतिम वर्ष व कार्यक्रमाला उपस्थित सर्व विदयार्थ्याकरिता “डिनर पार्टी” आयोजित करण्यात आली होती व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला.ऑफर लेटर डिस्ट्रिब्युशन सोहळ्याला ६५०० हुन अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.तसेच संपूर्ण प्रोग्रॅमचे थेट प्रक्षेपण फेसबुक व युट्युब वर करण्यात आले होते.