
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विज वितरण कंपनी,स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय कार्यालये,औद्योगिक व्यावसायिक ईत्यादी कडे विज बिलाची थकबाकी असु शकते थकबाकी नसल्यास विज वितरण कंपनीचे विज बिल वसुली करीता सामान्य नागरिकांना विज बिल वसुली करीता थकबाकी पोटी वेठीस धरल्या जाते अशी विज ग्राहकांच्या तोंडी तक्रारी ग्राहकांकडून समजतात शेवटी विज बिल थकीत न राहु देणे ही विज ग्राहकांची जबाबदारी आहे हे समजणे महत्वाचे आहे.विज ग्राहकांनो थकीत विज बिल ठेवल्यास,त्यावर व्याज आकारणी तसेच विज मिटर बंद असल्यास ॲव्हरेज रिडींग कमी विज वापर असुन जास्त रिडींगचे विज बिलाचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो,आपण बाहेर गावी जातांना विज रिडींगची नोंद घेत नाही,परंतू न वापरलेल्या विज युनिटचे अँव्हरेज बिल आपणास येते,त्यावेळेस आपण मिटर वरील चालू विज रिडींगचे वाचन घेऊन विज वितरण कंपनी कडे लेखी तक्रार नोंदवावी किंवा
ऑनलाईन नोंद करावी.म्हणजे मागील वाचन व चालु वाचन घेऊन,विज कर्मचारी एस.आय.आर घेवुन वापरलेल्या विज वापरांचे सुधारित बिल आपणास मिळेल.तसेच मागील सहा महिन्याचा विज वापराचे सी.पि.एल. पाहुन आपले विज बिल कमी बिल मिळेल.तसेच,आपल्याकडून कोणालाही विज पुरवठा देवु नये,तो गुन्हा म्हणून विज कंपनी आपणास दोषी ठरवु शकते.आपणास विज नियमा अंतर्गत दोष पत्र व एफ.आय.आर दाखल करुन हजारो रुपयांचा ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो.अश्या प्रकारच्या तक्रारी,मार्गदर्शनाकरीता ग्राहक पंचायतकडे आल्या आहेत.म्हणून ग्राहकांनी,विज बिलाबाबत जागृत राहून वेळीच सावध असावे.याकरिताच हे मार्गदर्शन आहे. कोणाचेही मन दुखवू नये व अतिरिक्त आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होऊ नये यासाठी हे प्राथमिक मार्गदर्शन ग्राहक पंचायत अंजनगांव सुर्जीचे तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदीजामेकर यांनी म्हटले.